बिहार सरकारकडून रमझाननिमित्त मुसलमान कर्मचार्‍यांसाठी नियमात पालट !

भाजपकडून टीका

पाटलीपुत्र – बिहार सरकारकडून रमझान मासानिमित्त मुसलमान कर्मचार्‍यांसाठी नियमात पालट करण्यात आला आहे. सरकारने रमझान मासात मुसलमान अधिकारी आणि कर्मचारी यांना कामावर १ घंटा लवकर येऊन १ घंटा लवकर सोडले जाणार आहे. येथून पुढे प्रत्येक वर्षी हे प्रावधान असणार आहे. सरकारने या संदर्भात अध्यादेशाही प्रसारित केला आहे. ‘आमच्या सरकारचा हा निर्णय धर्मनिरपेक्षतेला भक्कम करणार आहे’, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांनी व्यक्त केली आहे.

यावर भाजपचे नेते अरविंद कुमार सिंह यांनी टीका केली आहे, तसेच ‘मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चैत्र नवरात्र आणि श्रीरामनवमी यांनिमित्तही नियमांत अशाच प्रकारे पालट करावा’, अशी मागणी केली.

संपादकीय भूमिका 

धर्माच्या आधारावर नियमात पालट करणे, हे धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत बसते का ? धर्मनिरपेक्षतावाले आता गप्प का ?