ध्वनीक्षेपकाचा वापर केला, तरच अल्लाह नमाज ऐकेल का ? – भाजपचे नेते ईश्‍वरप्पा

भाजपचे नेते केएस ईश्‍वरप्पा

बेंगळुरू – मी जिथे जातो तिथे अजान माझ्यासाठी डोकेदुखी बनली आहे. ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पीकरचा) वापर केला, तरच अल्लाह नमाज ऐकेल का, असा प्रश्‍न भाजपचे नेते के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी एका सभेत बोलतांना उपस्थित केला. ईश्‍वरप्पा एका जाहीर सभेला संबोधित करत असतांना जवळच्या मशिदीतून ध्वनीक्षेपकावरून  आवाज आला. त्यावरून त्यांनी वरील विधान केले.

ते पुढे म्हणाले की,

आज नाही तर उद्या अजान संपेल; कारण याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे. हिंदु समुदाय मंदिरात प्रार्थना आणि भजन करतात. आम्ही धार्मिक आहोत; पण आम्ही ध्वनीक्षेपकाचा वापर करत नाही.