पतित पावन संघटनेकडून पुणे येथे आंदोलन

बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्याकडून अतिक्रमण झाल्याचे प्रकरण

पुणे – पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी पतित पावन संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. ‘पुणे महापालिकेने हे अतिक्रमणे लवकरात लवकर हटवावीत’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

पतित पावन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, ही अतिक्रमणे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्याकडून करण्यात आली असून पुण्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.