भारत विनाशाच्या ज्वालामुखीच्या पाठीवर बसला आहे !

‘या क्रांतीकारकांना कल्पनाही नव्हती की, स्वातंत्र्यानंतर एक दिवस असाही येईल की, या देशाचे राज्यकर्ते देशातील जनतेचे रक्त पितील आणि भारतवासियांचा शोक अन् आक्रोश यांनी देशाचे आकाश थरथर कापेल. आज आपली भूमी आणि आकाश कुठे आहे ? आता ही भूमी आणि आकाश लुटारू अन् भांडवलदार यांचे आहे. राजकारण हा एक व्यवसाय झाला आहे. येथे घराणेशाहीचा झेंडा फडकत आहे. घराणेशाही लोकशाहीला ठेचून काढत आहे. देशभक्त, निष्काम कर्मयोगी, जनतेचे सेवक, प्रामाणिक आणि निष्ठावान इत्यादी लोकांना राजकारणात कोणतेही महत्त्व नाही.’

(आर्य नीति, १०.११.२००९)