१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी आलेल्या अनुभूती
अ. शिबिराच्या पहिल्या सत्रात अनिष्ट शक्तींचा पुष्कळ त्रास होत होता; पण श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना पाहून चैतन्य, उत्साह आणि आनंद जाणवू लागला.
आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सभागृहात आल्यावर एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येत होता आणि वातावरणात गारवा जाणवत होता.
इ. त्या व्यासपिठावर बसल्या. तेव्हा मला त्यांच्याभोवती फिकट निळ्या रंगाचे चैतन्याचे वलय दिसत होते.
२ . शिबिराच्या अंतर्गत भाववृद्धी सत्संग चालू असतांना आलेल्या अनुभूती
२ अ. ‘आपण साक्षात् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समोर बसलो आहोत’, असे मला वाटत होते.
२ आ. भाववृद्धी सत्संगात स्वतःच्या पायांवर दैवी कण दिसून भावजागृती होणे : या भाववृद्धी सत्संगाच्या वेळी साधिका प्रार्थना आणि कृतज्ञता यांविषयी सांगत असतांना मला माझ्या पायांवर दैवी कण असल्याचे लक्षात आले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होऊन माझ्याकडून सतत कृतज्ञता व्यक्त होत होती. माझ्या डोळ्यांतून येणारे भावाश्रू थांबतच नव्हते. ही भावावस्था आणि कृतज्ञतारूपी भावाश्रू साधारणतः एक घंटा टिकून होते. त्या वेळी माझे मन निर्विचार होते.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती
अ. एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना पहाताच भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे’, असे मला वाटलेे.
आ. त्या वेळी मला दैवी कण दिसले.
इ. मी परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलण्यास आरंभ केला. त्या वेळी माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आल्यामुळे मला काहीच बोलता आले नाही. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही बोलता येत नसेल, तरी चालेल; पण ‘भावजागृती झाली’, हे महत्त्वाचे आहे. ‘भावजागृती होत आहे, म्हणजे साधना चांगली चालली आहे’, असे समजायचे.’’
ई. मला संतांच्या सभोवताली चैतन्याचे पिवळे वलय दिसत होते. ‘ते चैतन्य मी ग्रहण करत आहे’, असे मला अनुभवता आले.’
– कु. सावित्री गुब्याड (वय १८ वर्षे), सोलापूर
|