पू. (सौ.) अश्‍विनीताईंसारखे घडण्या देवा, आम्हा आशीर्वाद द्यावा !

पू. (सौ.) अश्‍विनी अतुल पवार यांचा कार्तिक कृष्ण एकादशी (२६.११.२०२४) या दिवशी ३५ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने साधकांनी अर्पण केलेले काव्यपुष्प येथे दिले आहे. 

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही ।
बोट धरूनी आम्हास शिकवी पू. (सौ.) अश्‍विनीताई ॥ १ ॥

तीच शिकवी, ती सांभाळी, सेवारत ती सदैव राही ।
देवासम झुकवतो मस्तक संतांच्या पायी ॥ २ ॥

साधनेने साधक घडला, भावाने हा अर्थ उमगला ।
प्रत्येक प्रसंगी वाट दाखवी पू. (सौ.) अश्‍विनीताई ॥ ३ ॥

ध्यास असे माऊलीला आम्हा साधकांना घडवण्याचा ।
स्वभावदोष-अहं दूर करूनी आनंद देते भावविश्‍वाचा ॥ ४ ॥

आता मागणे एकची देवा, संत अन् गुरु यांचा विसर न व्हावा ।
ताईंसारखे घडण्या देवा, आम्हा आशीर्वाद द्यावा ॥ ५ ॥

‘आईसमान सर्व साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणार्‍या
पू. (सौ.) अश्‍विनीताईंच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !’

– वैद्यकीय सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही.