जयपूर येथील सौ. शुभ्रा भार्गव यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

१. रामनाथी आश्रम पहातांना आलेल्या अनुभूती

१ अ. रामनाथी आश्रमात प्रवेश केल्यापासून शरिरात शीतलता अनुभवणे : ‘२०.६.२०२२ या दिवशी मी सनातनच्या रामनाथी आश्रमात पहिल्यांदाच आले होते. तेव्हापासून मला माझ्या शरिरात शीतलता अनुभवायला येत आहे.

सौ. शुभ्रा भार्गव

१ आ. आश्रमात वेगवेगळ्या रंगांतील प्रकाश दिसणे : मला आश्रमात अनेक वेळा वेगवेगळ्या रंगांचा प्रकाश दिसत होता. जसे आकाशात रात्री तारे चमचमतात, तशा प्रकारे मला तो प्रकाश कधी सोनेरी, निळा आणि पांढरा दिसत होता.

१ इ. श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती

१. आश्रमातील श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना माझी भावजागृती झाली.

२. ‘मी देवीकडून प्रक्षेपित होत असलेली स्पंदने ग्रहण करत असून श्री भवानीमाता डोळे उघडून माझ्याकडे पहात आहे’, असे मला जाणवत होते.

१ ई. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पहातांना आलेल्या अनुभूती

१ ई १. ‘प.पू. गुरुदेवांनी निर्जीव वस्तूंना सजीव केले आहे, तर ते आपल्यालाही त्यांच्या चैतन्याने जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करतील’, असे वाटणे : रामनाथी आश्रमातील सूक्ष्म जगताचे प्रदर्शन पहातांना मला वाटले, ‘प.पू. गुरुदेवांनी निर्जीव वस्तूंनासुद्धा सजीव केले आहे, तर ते मलाही आपल्या चैतन्याने या जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करतील’ आणि माझे मन पूर्णतः आश्वस्त झाले.

१ ई २. प्रदर्शनकक्षाच्या भिंतींना स्पर्श केल्यावर ‘त्यांच्यातील शक्ती आणि चैतन्य बोटांमधून शरिरात जात आहे’, असे जाणवणे : ‘प्रदर्शनकक्षाच्या भिंतीही श्वास घेत असून त्या सजीव झाल्या आहेत’, असे मला जाणवले. मी त्या भिंतींना स्पर्श केल्यावर ‘त्यांच्यातील शक्ती आणि चैतन्य माझ्या बोटांमधून शरिरात जात आहे’, असे मला जाणवले.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना पाहिल्यावर आलेल्या अनुभूती

अ. २२.६ २०२२ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना पाहिल्यावर मला त्यांच्या मस्तकावर त्रिशुळाचा आकार दिसला आणि ‘त्यातून शक्ती अन् चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले.

आ. त्या वेळी माझे नेत्र आपोआप मिटले गेले आणि ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे रूप प.पू. गुरुदेवांच्या रूपात रूपांतरित झाले’, असे दिसले.’

– सौ. शुभ्रा भार्गव, जयपूर, राजस्थान. (२५.९.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.