मूतखड्यावर उपयुक्त सनातन पुनर्नवा चूर्ण

सनातनची आयुर्वेदाची औषधे

‘१ चहाचा चमचा सनातन पुनर्नवा चूर्ण, अर्धा ग्रॅम हजरूल यहूद भस्म आणि अर्धा ग्रॅम श्वेत पर्पटी ही औषधे एकत्र करून दिवसातून २ वेळा वाटीभर कोमट पाण्यात मिसळून जेवणापूर्वी घ्यावे. वर लगेच जेवावे.

वैद्य मेघराज पराडकर

पेठेत पतंजलीची हजरूल यहूद भस्म आणि श्वेत पर्पटी ही औषधे प्रत्येकी ५ ग्रॅमच्या पाकिटांमध्ये मिळतात. ५ ग्रॅम औषधाचे समान १० भाग करावेत. हा दहावा भाग म्हणजे अर्धा ग्रॅम औषध. या उपचाराने मूतखडा फुटून लघवीवाटे बाहेर पडण्यास साहाय्य होते. हा उपचार १ मास करावा. यापेक्षा अधिक दिवस औषध घ्यायचे असल्यास वैद्यांचा समादेश घ्यावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२३)