पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाच्या दिवशी येथे १ सहस्र ७०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. शहर पोलीस दलाकडून या बंदोबस्ताचे आयोजन केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर्. राजा हेही पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थित होते.
Pune Police and paramilitary gear up for uneventful voting https://t.co/RA5ghGsyxW
— TOI Pune (@TOIPune) February 25, 2023
मतदानाच्या दिवशी शहर पोलीस दलातील १०० पोलीस अधिकारी-कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलीस दलातील ५०० सैनिक आणि राज्य राखीव पोलीस दलातील १०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. मतदानाच्या दरम्यान कोणताही अनुचित घटना घडू नये, यासाठी शीघ्रकृती दलाच्या तुकड्याही तैनात रहाणार आहेत. ७६ केंद्रावरील २७० बुथवर मतदान होणार असून ९ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. मतदान केंद्रांपासून १०० मीटर अंतरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, खाद्यपदार्थांच्या गाड्या, टपर्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कसबा पोटनिवडणुकीच्या दरम्यान पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता भरारी पथकांनी नाकाबंदीत ३२ लाख १८ सहस्र रुपये एवढी रक्कम कह्यात घेऊन ती रक्कम निवडणूक अधिकार्यांकडे सुपूर्द केली. अवैध शस्त्र बाळगणार्यांकडून ११९ शस्त्रे जप्त केली असून ३२ सहस्र ८८५ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.