हडपसर (पुणे) येथील युवकाने २२ सहस्र नाण्यांपासून बनवले शिवलिंग !

दीपक घोलप या तरुणाने नाणी वापरून बनवलेले शिवलिंग !

पुणे – येथील काळेपडळ येथील दीपक घोलप या तरुणाने वेगवेगळ्या मूल्यांची नाणी वापरून शिवलिंग बनवले आहे. त्यासाठी त्याने २२ सहस्र ३०१ नाण्यांचा वापर केला आहे. हा तरुण शिवभक्त आहे. तो नियमित शिवमंदिरात जातो. या शिवलिंगाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. (आपण ज्या देवतेची भक्ती करतो, ती आध्यात्मिक स्तरावर कशा प्रकारे करायला हवी, हे समजून घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे धर्मशास्त्रविरोधी कृती केल्याने आपल्याला लाभ होत नाही ! – संपादक)

भावनेतून साकारलेल्या मूर्तीत देवत्व येत नाही !

वेदाचार्य घैसासगुरुजी

याविषयी पुणे येथील वेदाचार्य मोरेश्वर घैसासगुरुजी म्हणाले की, एखादी व्यक्ती आपल्या भावनेतून देवतेची मूर्ती साकारते; पण ती केवळ एक शोभेची वस्तू असते. त्यात देवत्व येऊ शकत नाही. जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही, तोपर्यंत त्या मूर्तीत देवत्व येऊ शकत नाही आणि एखाद्या प्रकारच्या डिंकाने चिकटवून सिद्ध केलेल्या मूर्तीवर अभिषेक अन् पूजा या गोष्टी केल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ती केवळ शोभेची वस्तू रहाते.

संपादकीय भूमिका

अशा धर्मशास्त्रविरोधी कृती केल्या जाणे, हा समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम !