(म्हणे) ‘मुशर्रफ शांततेची खरी शक्ती होते !’-काँग्रेसचे खासदार शशी थरूर

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची वैचारिक दिवाळखोरी !

शशी थरूर व परवेझ मुशर्रफ

नवी देहली – कधी भारताचे कट्टर शत्रू राहिलेले परवेझ मुशर्रफ वर्ष २००२ ते  २००७ या काळात शांततेसाठी खरी शक्ती बनवले होते, असे ट्वीट काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केले आहे. (मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी भारतद्वेष्ट्यांचे उदात्तीकरण करणार्‍या काँग्रेसवाल्यांचे राजकीय अस्तित्व राष्ट्रप्रेमी संपवतील, हे निश्‍चित ! – संपादक) ‘मी संयुक्त राष्ट्रांमध्ये त्या काळात नेहमीच त्यांची भेट घेत असे. ते चतुर आणि मुत्सद्दी असून त्यांच्यात वैचारिक सुस्पष्टता आहे, हे माझ्या लक्षात आले होते’, असेही थरूर यांनी पुढे म्हटले आहे. थरूर यांच्या या ट्वीटवर भाजपने टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

भारताचा सतत द्वेष करणार्‍या आणि वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध घडवणार्‍या मुशर्रफ यांच्याविषयी राष्ट्रघातकी काँग्रेसवालेच असे बोलू शकतात, यात आश्‍चर्य ते काय ?