उत्तरप्रदेशातील तरुणाचे मुंबईतील मौलवीच्या प्रभावाखाली येऊन इस्लाममध्ये धर्मांतर !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते कावेबाज मौलवींच्या जाळ्यात अडकतात !

मुंबई – कौशांबी (उत्तरप्रदेश) येथील उदयराज कोरी हा तरुण मुंबईत आला होता. काही काळाने तो पुन्हा उत्तरप्रदेश येथे परतला. तेव्हा त्याने धर्मांतर केले असल्याचे उघडकीस आले. त्याने त्याचे नाव पालटून अहमद हुसेन ठेवले असल्याचे त्याच्या कुटुंबियांना समजले. यामुळे त्या सर्वांना मोठा धक्का बसला. धर्मांतराविषयी अहमदने सांगितले, ‘‘मी मुंबईत गेल्यावर एका मौलवीने भ्रमणभाषवर इस्लाम धर्माविषयीचा एक व्हिडिओ दाखवला होता. तो पाहून मी स्वेच्छेने हिंदु धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला.’’ (धर्मांतर करण्यासाठी मौलवींकडून केला जाणारा कावेबाजपणा जाणा ! – संपादक) या धर्मांतराप्रकरणी कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.


या प्रकरणी उत्तरप्रदेशातील कौशांबी येथील एका युवकाला कह्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. संबंधित मौलवीला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांचा प्रयत्न चालू आहे. धर्मांतरित झालेल्या युवकाची हिंदु धर्मीय आई त्याला समजावत आहे. तिला आशा वाटते की, मुलगा पुन्हा हिंदु धर्म स्वीकारेल.

युवकाकडून इस्लामनुसार कृती होत असल्याने कुटुंबीय त्रस्त !


अहमद आधी हिंदु असतांना घरातील मोठ्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करत असे. आता तो ‘सलाम’ म्हणतो. ‘मुंबईतून आल्याने तो असे बोलत असेल’, असे प्रथम वाटले; पण नंतर त्याने धर्मांतर केल्याचे समजल्यावर प्रकरणाचा उलगडा झाला. अहमद घरात नमाजही पढू लागला. त्यामुळे घरचे पुष्कळ त्रस्त झाले.