बांगलादेशमध्ये मुसलमानांकडून श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

ढाका (बांगलादेश) – नेतरकोना जिल्ह्यातील मोहनगंज नाराइच गावामध्ये २६ जानेवारीला वसंतपंचमीच्या दिवशी मुसलमानांनी श्री सरस्वतीदेवीच्या पूजा मंडपावर आक्रमण करून देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. आक्रमणाच्या वेळी येथे देवीची आरती चालू होती. या घटनेत २ हिंदु घायाळ झाले. आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. नेतरकोना जिल्ह्यातील पूरबधाला बाजारात २३ जानेवारीलाही मुसलमानांनी आक्रमण करून श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीसह अन्य देवतांच्या मूर्तींचीही तोडफोड केली होती.

संपादकीय भूमिका 

धर्मांध मुसलमानांच्या लेखी मूर्तीपूजा इस्लामला मान्य नसल्यामुळेच त्यांचा आतापर्यंतचा इतिहास मूर्तीभंजन करण्याचाच असल्याने आजही ते अशीच कृत्ये करत आहेत; मात्र अशांना कुणीही धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, पुरोगामित्व आदींचे डोस पाजण्याचा प्रयत्न करत नाहीत; मात्र हिंदूंना हे डोस पाजून गेली अनेक दशके गुंगीमध्ये ठेवण्यात आले आहे, हे हिंदू लक्षात घेतील तो सुदिन !