आज रथसप्तमी
माघ मासातील शुक्ल सप्तमीपासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून ‘रथसप्तमी’ असा शब्द वापरला जातो. सूर्यदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो.
‘७ फेब्रुवारी २०२२ या रथसप्तमीच्या दिवशी सकाळी ७.५० वाजता मी देवाला नमस्कार करण्यासाठी देवघरात गेले. तेव्हा तेथे देवतांच्या चित्रांवर सूर्यकिरण पडलेले दिसले. त्या वेळी ‘हा देवतांचा किरणोत्सवच आहे’, असे जाणवले आणि मला पुष्कळ आनंद झाला. जसजसे सूर्याचे किरण खालून वर सरकत गेले, तसतशी माझ्या आनंदात वृद्धी होत गेली. मी त्याचे छायाचित्र काढल्यावर त्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राभोवती मला प्रभावळ दिसली. माझी अनेक दिवसांपासून किरणोत्सव पहाण्याची इच्छा देवाने पूर्ण केली. आज सूर्यदेवाने देवतांच्या चित्रांना स्पर्श केला आणि हा किरणोत्सव आम्हा उभयतांना (मी आणि यजमान) अनुभवायला दिला, त्याबद्दल परात्पर गुुरु डॉक्टर आणि सूर्यनारायण यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. श्रुती सहकारी, फोंडा, गोवा (७.२.२०२२)
|