हिंदु जनजागृती समितीच्‍या शिष्‍टमंडळाचे उत्तरप्रदेशचे ऊर्जा आणि नगरविकास मंत्री अरविंद कुमार यांना ‘हलाल अर्थव्‍यवस्‍था’ विषयावर निवेदन सादर

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती संपर्क अभियान’ राबवण्‍यात येत आहे. या अभियानाच्‍या अंतर्गत ‘हलाल अर्थव्‍यवस्‍था आणि त्‍याचे देशावर होत असलेले दुष्‍परिणाम’, हा विषय राज्‍य सरकारपर्यंत पोचवण्‍याच्‍या दृष्‍टीने उत्तरप्रदेशचे भाजप नेते तथा ऊर्जा आणि नगरविकास मंत्री श्री. अरविंद कुमार यांची त्‍यांच्‍या निवासस्‍थानी भेट घेतली.

(उजवीकडे) मंत्री श्री. अरविंद शर्मा यांना ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ आणि निवेदन देतांना श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी आणि सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ

या वेळी समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ आणि समिती समन्‍वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी त्‍यांची भेट घेतली. या वेळी श्री. अरविंद कुमार यांना ‘हलाल अर्थव्‍यवस्‍थे’विषयी विस्‍तृत माहिती सांगून निवेदन सादर करण्‍यात आले. या वेळी श्री. शर्मा यांनी ‘याविषयी अभ्‍यास करून निश्‍चितपणे पावले उचलण्‍यात येतील’, असे आश्‍वासन दिले. याप्रसंगी सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी श्री. शर्मा यांना ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट स्‍वरूपात दिला.