५६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्ग लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली सरंद (माखजन, जिल्‍हा रत्नागिरी) येथील कु. दिव्‍या दयानंद जड्यार (वय १२ वर्षे) !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. दिव्‍या दयानंद जड्यार ही या पिढीतील एक आहे !

माघ शुक्‍ल षष्‍ठी (२७.१.२०२३) या दिवशी सरंद (माखजन, जिल्‍हा रत्नागिरी) येथील कु. दिव्‍या दयानंद जड्यार हिचा बारावा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने तिच्‍या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

कु. दिव्‍या जड्यार

कु. दिव्‍या दयानंद जड्यार हिला तिच्‍या बाराव्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. वय – ३ ते ५ वर्षे

१ अ. जिज्ञासू वृत्ती : ‘कु. दिव्‍या प्रत्‍येक गोष्‍ट जिज्ञासेने जाणून घेण्‍याचा प्रयत्न करते. ‘‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर कृष्‍णच आहेत ना ?’’, असे ती मला विचारते.

१ आ. देवपूजेची आवड : दिव्‍या प्रतिदिन देवपूजेची सिद्धता करते. ती देवतांना हळद-कुंकू वाहून उदबत्तीने ओवाळते. ती स्‍तोत्रे म्‍हणते. तिला गणपतिस्‍तोत्र आणि पसायदान म्‍हणता येते. ती प्रतिदिन सायंकाळी देवाजवळ दिवा लावल्‍यावर ‘शुभं करोति’ म्‍हणून घरातील सर्वांना नमस्‍कार करते.

२. वय – ५ ते ७ वर्षे

२ अ. दिव्‍याला सात्त्विक कपडे घालायला आवडतात.

२ आ. स्‍पष्‍टवक्‍तेपणा : आमचे काही चुकत असेल, तर दिव्‍या ते लगेच लक्षात आणून देते. शाळेतही काही चूक लक्षात आल्‍यास ती शाळेतील मुलांना न घाबरता सांगते.

२ इ. सात्त्विक गोष्‍टींची आवड : दिव्‍या प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या भजनाच्‍या तालावर नाचते आणि भजन म्‍हणते. तेव्‍हा ती पुष्‍कळ आनंदी दिसते. ती दूरचित्रवाणीवरील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांसारख्‍या सात्त्विक मालिका पहाते.

२ ई. साधनेची आवड : दिव्‍याला नामजपादी उपाय करायला आवडतात. ती ‘सनातन’च्‍या ग्रंथांचे वाचन करते.

२ उ. दिव्‍या देवतांची सुंदर चित्रे काढते. तिचे अक्षरही सुंदर आहे.

कु. दिव्‍याने रेखाटलेले श्रीकृष्‍ण आणि गोपीचे चित्र
कु. दिव्‍याने रेखाटलेले श्री दुर्गादेवीचे चित्र

३. वय – ७ ते ८ वर्षे

३ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती भाव

१. एकदा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी दिव्‍याला ‘चॉकलेट’ दिले होते. तिने त्‍या चॉकलेटचे वेष्‍टन जपून ठेवले आहे. ते पाहिले की, ती परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंची आठवण काढते.

२. एकदा दिव्‍या परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या पादुकांचे दर्शन घेण्‍यासाठी माझ्‍या समवेत मुंबईतील सेवाकेंद्रात आली होती. पादुकांचे दर्शन घेतल्‍यावर तिला पुष्‍कळ आनंद झाला.

४. वय – ८ ते १० वर्षे

४ अ. बालसत्‍संगाला नियमित उपस्‍थित रहाणे : बालसाधकांसाठी चालू असलेल्‍या ‘ऑनलाईन’ बालसत्‍संगाला दिव्‍या नियमित उपस्‍थित असते. ती सत्‍संगात सहभागी होऊन मुलांना नामजप करायला आणि स्‍तोत्रे, प्रार्थना आदी म्‍हणायला शिकवते.

४ आ. ती स्‍वतःचा व्‍यष्‍टी साधनेचा आढावा नियमित देते.

४ इ. सेवेसाठी साहाय्‍य करणे : दिव्‍या आम्‍हाला ग्रंथ मोजणे, सात्त्विक उत्‍पादने पडताळून घेणे इत्‍यादी सेवांत साहाय्‍य करते.

४ ई. त्‍यागी वृत्ती : मी नोकरी करत असलेल्‍या आस्‍थापनात गुणवंत विद्यार्थ्‍यांना पारितोषिक दिले जाते. ते दिव्‍यालाही मिळते. पारितोषिक म्‍हणून मिळालेले पैसे ती अर्पण करते. तिला खाऊसाठी मिळालेले पैसेही ती अर्पणपेटीत टाकते.

५. स्‍वभावदोष

हट्टीपणा आणि राग येणे.

कृतज्ञता

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने अशी समजूतदार आणि गुणी कन्‍या मिळाली. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. प्रीती आणि श्री. दयानंद जड्यार (कु. दिव्‍याचे आई-वडील), सरंद (माखजन, जिल्‍हा रत्नागिरी). (२८.१०.२०२१)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.