‘पठाण’ चित्रपटाला देशात ठिकठिकाणी विरोध !

  • इंदूरमध्ये चित्रपटाचे खेळ रहित

  • चित्रपटगृहावरील भित्तीपत्रके आणि फलक फाडले !

  • अनेक ठिकाणी चित्रपटगृहाबाहेर निदर्शने

नवी देहली – ‘पठाण’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये त्याला विरोधही करण्यात येत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल आदी राज्यांतील काही शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करण्यासह खेळ बंदही पाडण्यात आले आहेत. तसेच चित्रपटाची भित्तीपत्रके आणि फलक फाडण्याच्याही घटना घडल्या आहेत.

१. मध्यप्रदेशातील इंदूरमधील सपना संगीता चित्रपटगृहाबाहेर हिंदु संघटनांकडून निदर्शने करण्यात आल्यानंतर सकाळचा खेळ रहित करण्यात आला. कार्यकर्त्यांनी चित्रपट रहित न केल्यास चित्रपटगृह पेटवून देण्याची धमकी दिली. या वेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

२. ग्वाल्हेरमध्ये बजरंग दलाने चित्रपटगृह पेटवण्याची धमकी दिली आहे.

३. उत्तरप्रदेशच्या आगरा येथे हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी २४ जानेवारीला विरोध करत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी चेतावणी दिली होती.

४. कर्नाटकच्या कलबुर्गी येथे चित्रपटगृहावर दगडफेक करण्यात आली.