पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना ठार मारण्याच्या धमक्या !

‘शिवसेना हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष निशांत शर्मा यांना धमकी !

निशांत शर्मा

चंडीगड – पंजाबमध्ये सातत्याने खलिस्तानवाद्यांकडून हिंदु नेत्यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यासह त्यांच्या हत्या करण्याच्याही घटना घडत आहेत. पंजाबमधील ‘शिवसेना हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष निशांत शर्मा यांना विदेशी दूरभाष क्रमांकांवरून सातत्याने ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या संदर्भात सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित होत असून यात एक व्यक्ती हातात ‘एके ४७’ रायफल घेऊन निशांत शर्मा यांना शिवीगाळ करत हवेत गोळीबार करत असतांना दिसत आहे. शर्मा यांच्या प्रमाणेच अमित अरोरा, पवन गुप्ता आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ नेतेही खलिस्तानी आतंकवाद्यांचे लक्ष्य आहेत. यापूर्वी लुधियाना येथे हिंदु नेते सुधीर सूरी यांची हत्या करण्यात आली होती.

निशांत शर्मा यांना जग्गू भगवानपुरिया आणि गोल्डी ब्रार हे दोघे धमकी देत आहेत. यापूर्वी सूरी यांच्या हत्येनंतर पाकिस्तानमध्ये असलेला खलिस्तानी आतंकवादी गोपाल सिंह चावला याने व्हिडिओ प्रसारित करून पुढील लक्ष्य निशांत शर्मा आणि अमित अरोरा असल्याचे सांगितले होते.

संपादकीय भूमिका

  • पंजाब ‘दुसरे काश्मीर’ होण्यापूर्वी खलिस्तानवाद्यांची वळवळ चिरडून टाकण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !
  • पंजाबमध्ये हिंदु अल्पसंख्यांक असल्याचा परिणाम लक्षात घ्या ! हिंदू संपूर्ण देशातून या स्थितीला पोचण्यापूर्वीच हिंदु राष्ट्र स्थापन करा !