कोल्हापूर – प्रतिवर्षीप्रमाणे स्वामी भक्त, स्वामी सेवक यांच्या वतीने ‘स्वामी समर्थ नामस्मरण सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी समर्थ नामस्मरण सोहळ्याचे हे ६ वे वर्ष असून हा सोहळा २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता पंचगंगा नदी घाट परिसरात होणार आहे, अशी माहिती स्वामी भक्त सेवक समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. या प्रसंगी सर्वश्री अरुण गवळी, गुरुदेव स्वामी, धनंजय महिंद्रकर, अमित पाटील, अभिजित पाटील, बाळासाहेब राऊत उपस्थित होते.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आनंदाने सहभागी होतात. हा सोहळा सर्वांसाठी खुला असतो आणि यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. यावर्षी पंचगंगा नदी घाट परिसरात आकर्षक सजावटीसह प्रतिवर्षीप्रमाणे स्वामींच्या मूर्तीचे पूजन आणि पंचगंगा नदीची आरती करून नामस्मरण सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. तरी सर्वांनी सायंकाळी ५.३० वाजता नदीवर उपस्थित रहावे, असे आवाहन स्वामी भक्त सेवक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.