थुंकून ‘तंदुरी रोटी’ बनवणार्‍या तसीरुद्दीनला अटक !

उत्तरप्रदेशमध्ये ‘थुंकी जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील मदिना हॉटेलमधील प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये तसीरुद्दीन हा हॉटेल कामगार ‘तंदुरी रोटी’साठी बनवलेल्या पिठात थुंकतांना दिसत आहे. त्यामुळे तसरुद्दीनला १९ जानेवारी २०२३ या दिवशी अटक करण्यात आली. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे, असे साहिबाबादच्या पोलीस अधीक्षक पूनम मिश्रा यांनी सांगितले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदु रक्षा महानगर संयोजक अनु चौधरी यांनी मोड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. आरोपीच्या विरोधात कलम १८८, २६९ आणि २७०च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सौजन्य कडक

रोटीच्या पिठामध्ये थुंकून त्या खाऊ घालण्याची अनेक प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये मेरठ येथील असाच एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये शोयब नावाचा मुसलमान कामगार मवाना परिसरातील रॉयल हॉटेलमध्ये थुंकून रोटी भाजत होता.

संपादकीय भूमिका 

वारंवार अशा घटना समोर येऊनही किती जणांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे ? असे प्रकार होणार्‍या उपहारगृहांवरही बंदी घातली पाहिजे !