वर्धा येथे प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखा !’ चळवळ

जिल्‍हाधिकारी कार्यालय अधीक्षक विजय लोखंडे यांना निवेदन देतांना राष्‍ट्रप्रेमी

वर्धा, १८ जानेवारी (वार्ता.) – २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनाच्‍या निमित्ताने प्‍लास्‍टिकच्‍या राष्‍ट्रध्‍वजाची विक्री करतात, तसेच जे नागरिक, संस्‍था, आस्‍थापने, समूह राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान करतात, त्‍यांच्‍यावर कठोर कायदेशीर  कारवाई करावी, या मागण्‍यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नुकतेच येथील जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देण्‍यात आले. हे निवेदन कार्यालय अधीक्षक विजय लोखंडे यांनी स्‍वीकारले. यासमवेतच जिल्‍हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनाही निवेदन देण्‍यात आले. या वेळी समितीचे श्री. पुरुषोत्तम हरणे, श्री. जगदीश इंगोले, सौ. भक्‍ती चौधरी, सौ. वंदना कलोडे आदी उपस्‍थित होते.