पिंगोरी (जिल्हा पुणे) येथे ‘सामूहिक गोपालन प्रकल्प’

प्रतिकात्मक छायाचित्र

वाल्हे (पुणे) – ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने ‘ॲटोस कंपनी’ आणि ‘रोटरी क्लब’ यांच्या सहकार्याने पिंगोरी येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून ‘सामूहिक गोपालन प्रकल्प’ चालू करण्यात आला आहे. बचत गटातील महिलांना प्रत्येकी १ गाय देण्यात आली असून या सर्व गायींचे एकाच ठिकाणी पालन केले जाणार आहे. त्यासाठी गोठा, मिल्क पार्लर, पाणी, सोलरसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

‘ॲटोस कंपनी’च्या सी.एस्.आर्. फंडातून ४८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ‘सामूहिक गोपालन प्रकल्पा’चे उद्घाटन ‘अ‍ॅटोस आस्थापना’चे सी.एस्.आर्. प्रकल्पप्रमुख मुरली मेनन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी गोपूजन केले.