बंगालमधील एका शाळेत माध्यान्ह भोजनातील वरणामध्ये आढळला साप !

  • भोजन ग्रहण केल्याने ३० विद्यार्थी आजारी !

  • पालकांकडून मुख्याध्यापकांना मारहाण !

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील मयूरेश्‍वर भागातील एका प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिल्यानंतर जवळपास ३० विद्यार्थी  आजारी पडले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेची प्राथमिक चौकशी केली असता विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वरणामध्ये साप आढळला. विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेले हे भोजन शाळेतीलच एका कर्मचार्‍याने बनवले होते. साप आढळल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा अरोप करत शाळेच्या मुख्याध्यापकांवर आक्रमण केले, तसेच त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड केली.

यापूर्वीच राज्यातील पूर्व मेदिनीपूर येथे मुसलमान विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनामध्ये झटका मांस दिल्याने त्यांच्या पालकांनी विरोध केल्याचे समोर आले होते.

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !