‘लव्ह जिहाद’ थांबवायचा असेल, तर भाजपची आवश्यकता ! – भाजपचे प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील

काँग्रेसकडून टीका !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील

मंगळुरू (कर्नाटक) – तुम्ही लोकांनी आता रस्ते, नाले आणि अन्य छोट्या गोष्टींविषयी विचार किंवा चर्चा करता कामा नये. तुमच्या मुलांच्या आयुष्याशी संबंधित प्रश्‍न म्हणजेच ‘लव्ह जिहाद’ थांबवायचा असेल, तर आपल्याला भाजपची (भाजप सरकारची) आवश्यकता आहे, असे विधान भाजपचे नेते नळीनकुमार कटील यांनी येथील ‘बूथ विजय अभियान’ कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना केले.

१. कटील पुढे म्हटले की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पी.एफ्.आय.वर) बंदी घालण्याआधी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगलसदृश परिस्थिती होती. आज पी.एफ्.आय.वर बंदी घालण्यात आली नसती, तर मंचावर भाजपाचे नेते मोनप्पा भंडारी, आमदार वेदव्यास कामत आणि दक्षिण कन्नड येथील नेते हरि कृष्ण बंटवाळ आपल्यात नसते. त्यांच्या केवळ छायाचित्रांना हार घातलेले दिसले असते.

२. कर्नाटक प्रदेश काँग्रेसने कटील यांच्या या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करत म्हटले आहे की, राज्याचा विकास, रोजगार आणि शिक्षण हे सर्वसाधारण प्रश्‍न आहेत. भाजपने पक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘विकासाविषयी चर्चा करू नये’, असे सांगणे, हे फार लज्जास्पद आहे. (काँग्रेसने कधी लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल प्रमाणापत्राद्वारे समांतर अर्थव्यवस्था आदी राष्ट्राशी संबंधित सूत्रांवर चर्चा केली आहे का ? – संपादक)