‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये पालट करण्याची सेन्सॉर बोर्डाची सूचना

 

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आणि गीतकार प्रसून जोशी (डावीकडे)

नवी देहली –  सद्या केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाकडे (सेन्सॉर बोर्डाकडे) प्रमाणपत्रासाठी ‘पठाण’ चित्रपट आला आहे. या संदर्भात प्रक्रिया चालू आहे. मंडळाने निर्मात्यांना ‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये काही पालट करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती या मंडळाचे अध्यक्ष आणि गीतकार प्रसून जोशी यांनी दिली.

‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पडुकोण यांनी भगव्या रंगाचे अंतर्वस्त्र घातल्याने त्याचा हिंदूंकडून विरोध केला जात आहे.