राहुल गांधी यांनी वर्ष २०२० पासून ११३ वेळा केले सुरक्षा नियमांचे उल्लंघन !

काँग्रेसच्या आरोपावर सी.आर्.पी.एफ्.कडून उत्तर !

नवी देहली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेकदा विहित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. राहुल गांधी यांनी वर्ष २०२० पासून ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. असे ‘भारत जोडो’ यात्रेच्या काळातही घडले आहे, असे उत्तर केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सी.आर्.पी.एफ्.ने) दिले आहे. ‘भारत जोडो’ यात्रेत सुरक्षेचा भंग झाला असून हलगर्जीपणामुळे राहुल गांधी यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे योग्य सुरक्षाव्यवस्था पुरवली जावी’, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले होते. यावर सी.आर्.पी.एफ्.ने वरील उत्तर दिले आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यानंतर अनुचित घटना घडली, तर त्याला कोण उत्तरदायी रहाणार, हे काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे !