नगर येथे तरुणीवर चौघा धर्मांधांचा सामूहिक बलात्कार !

घृणास्पद कृत्यामध्ये धर्मांध महिलेचाही सहभाग !

नगर – येथील भिंगार कँप पोलिसांच्या हद्दीत २४ डिसेंबर या दिवशी काटवण परिसरात २७ वर्षीय वयाच्या एका महिलेला ५ जणांनी रिक्शा आणि दुचाकीवरून येऊन मारहाण करत शिवीगाळ केली अन् एका आरोपी महिलेने पीडित महिलेला धरून ठेवले. त्यानंतर चौघा नराधम आरोपींनी या असाहाय्य पीडित तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. (भारतात शिक्षेची कार्यवाहीही तात्काळ होत नाही. त्यामुळे बलात्कार्‍यांना शिक्षेची भीती वाटत नाही. याउलट इस्लामी देशांत शिक्षेची कार्यवाही काही दिवसांमध्येच केली जाते. सौदी अरेबियात ४ दिवसांत जाहीर शिरच्छेद, अफगाणिस्तानमध्ये जाहीररित्या गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी घालून त्याला ठार करणे अशा शिक्षा देण्यात येतात. भारतात गुन्हेगाराला शिक्षा जाहीर होणे आणि तिची कार्यवाही होणे या प्रक्रिया जलद झाल्यास संबंधितांना न्याय मिळू शकेल. – संपादक)

 (सौजन्य : NEWS TODAY 24 AHMEDNAGAR)

पीडित महिलेला धरून ठेवणारी आरोपी शबनम उपाख्य शमीन शेख या महिलेसह बलात्कार करणारे आरोपी इम्रान शेख, शाहानू शेख, रिक्शाचालक अकबर शेख, बार्शीत खान या ५ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी आणि तक्रारदार यांच्यात पोलीस ठाण्यात परस्परविरोधी आधीच्या तक्रारी, गुन्हे नोंद आहेत असा तक्रारीत उल्लेख आहे. पीडितेला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी नेले.