‘साधनेसाठी पैसा, वेळ आदींच्या त्यागापेक्षा ‘मी’पणाचा त्याग, हा खरा त्याग आहे. ‘मी’पणाचा त्याग म्हणजे, ‘मी’, ‘माझे’, ‘स्वकेंद्रित वृत्ती’ आदींचा त्याग. यासाठी गुरु किंवा देव यांना प्रार्थना करावी, ‘दिवसभरातील प्रत्येक प्रसंगात मला माझ्या ‘मी’पणाची जाणीव होऊन तो दूर करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होवोत.’ यानुसार केलेल्या प्रयत्नांचा आढावा प्रतिदिन देवाला द्यावा.’
– (पू.) संदीप आळशी (१४.१२.२०२२)