चुकीच्या बँक खात्यात पाठवलेले पैसे परत मिळण्यासाठी पुढील गोष्टी करा !

सध्या आर्थिक व्यवहार करतांना आपण भ्रमणभाषद्वारे ‘ऑनलाईन’ किंवा काही वेळा आपण चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवतो. चुकीच्या खात्यात पाठवलेले पैसे परत कसे मिळवायचे ? ते जाणून घेऊया.

१. जर चुकून दुसर्‍या बँक खात्यात पैसे ‘ट्रान्सफर’ झाले आहेत, तर बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधा. चुकीच्या खात्यात पैसे ‘ट्रान्सफर’ झाल्याचे त्यांना सांगा.

२. चुकीच्या खात्यात पैसे ‘ट्रान्सफर’ झाल्याचे सर्व पुरावे त्यांना दाखवा.

३. पैसे परत करण्यासाठी बँक त्या व्यक्तीला एक ‘मेल’ पाठवते. त्या व्यक्तीची अनुमती मिळाल्यावर बँक ७ दिवसांच्या आत तुमचे पैसे तुम्हाला परत करते.

४. पैसे इतर बँकेच्या शाखेच्या खात्यात ‘ट्रान्सफर’ झाले असतील, तर तुम्हाला तुमची समस्या संबंधित बँकेच्या अधिकार्‍यांना सांगावी लागेल.

५. ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, ती व्यक्ती पैसे परत करण्यास नकार देत असेल, तर त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट करा.

६. जर ती व्यक्ती तुमचे पैसे परत करण्यास सिद्ध असेल, तेव्हा काही कागदपत्रे (उदा. स्वतःचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा) बँकेत जमा करावी लागतील. यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात.

(साभार : ‘मुक्तपीठ’ संकेतस्थळ)