अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण
मुंबई – अभिनेत्री तुनिषा शर्मा हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी तिचा प्रियकर आणि अभिनेता शिझान खान याला २४ डिसेंबर या दिवशी अटक करण्यात आली. न्यायालयाने २५ डिसेंबरला त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती मुंबईचे साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली.
१. तुनिषा शर्मा ही दूरचित्रवाहिनीवरील एका मालिकेत काम करत होती. तुनिषाचे शिझान खान समवेत प्रेमसंबंध होते; पण आत्महत्येच्या १५ दिवसांपूर्वीच त्यांचा प्रेमभंग झाला होता. यानंतर तिने आत्महत्या केली.
२. चित्रीकरण आटोपून ती साधारणतः दुपारी साडेतीनच्या सुमारास ती ‘मेकअप’ करण्यात येत असलेल्या खोलीत गेली आणि तिने गळफास घेतला. सायंकाळी ५ वाजता याविषयी समजल्यावर सहकार्यांनी तिला वसई येथील खासगी रुग्णालयात भरती केले; पण आधुनिक वैद्यांनी तिला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येच्या प्रकरणी तुनिषाच्या आईने शिझान खान याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होते.
२. तुनिषाच्या शवविच्छेदन अहवालात ‘तिचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला’, असे सांगण्यात आले आहे. आरोपी शिझान आणि तुनिषा यांचे भ्रमणभाष कह्यात घेण्यात आले आहेत.
(म्हणे) ‘हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे असल्याचे समोर आलेले नाही !’ – चंद्रकांत जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई
या प्रकरणी अद्याप प्रेमसंबंध, धमकावणे किंवा ‘लव्ह जिहाद’ असा कोणताही प्रकार समोर आलेला नाही, अशी माहिती मुंबईचे साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली.
मेरी सभी माताओं, बहनों से हाथ जोड़कर विनती है अपनी बेटियों को धर्म के प्रति सच्चा और निष्ठावान बनाएं ताकि वो आगे जाकर लक्ष्मीबाई बनकर विधर्मीयों का शिकार करें, श्रद्धा बन उनका शिकार ना बने , हाल ही में तुनिषा शर्मा को भी इसी प्रकार से अपनी जान गवाना पड़ा l #TunishaSharma #Sheezan pic.twitter.com/kguCJlddRX
— Kangana Ranaut (@KanganaR_) December 25, 2022
तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार समोर आला, तर सखोल चौकशी होईल ! – राम कदम, आमदार, भाजप
पोलीस या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करतील. यात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार समोर आला, तर त्यादृष्टीनेही सखोल चौकशी होईल. ‘लव्ह जिहादच्या मागे कोणती संघटना आहे का ?’, ‘त्यांचे काय षड्यंत्र आहे ?’, याचेही अन्वेषण पोलीस करतील आणि तुनिषाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील.