वाई (जिल्हा सातारा) येथे ६ सहस्र धर्माभिमान्यांच्या उपस्थितीत ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ !

सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून श्रद्धा वालकर हिची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशात हिंदु जनआक्रोश मोर्चे काढून निषेध नोंदवण्यात येत आहेत. वाई (जिल्हा सातारा) येथेही ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने भव्य ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्च्याला वाई पंचक्रोशीसह संपूर्ण जिल्ह्यातून ६ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदू उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

श्री महागणपतीला वंदन करून गणपति घाटावरून सकाळी ११.३० वाजता मोर्च्याला प्रारंभ झाला. नंतर मोर्चा गंगापुरी, दातार रुग्णालय, नगरपालिका, किसन वीर चौकमार्गे पोलीस ठाण्यासमोर आला. तेव्हा मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. तत्पूर्वी हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन त्यांना निवेदन दिले. मोर्च्यामध्ये युवक-युवतींची संख्या लक्षणीय होती. मोर्च्याच्या शेवटी लव्ह जिहादला बळी पडलेल्या एका युवतीने स्वानुभव सांगितला.


‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून धर्मांधांकडून राष्ट्र पोखरले जात आहे ! – सौ. भक्ती डाफळे

सौ. भक्ती डाफळे

हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे म्हणाल्या, ‘‘देशात ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. एका बाजूला लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांध राष्ट्र पोखरत आहेत, तर दुसर्‍या बाजूला ख्रिस्ती धर्मांतराच्या माध्यमातून धर्म पोखरत आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. धर्माभिमानशून्य बनलेला सकल हिंदु समाज मोठ्या संख्येने या षड्यंत्राला बळी पडत आहे. श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, स्वधर्म पाळतांना मृत्यू आला, तरी परधर्म स्वीकारण्याहून तो मृत्यू श्रेयस्कर आहे. पाण्यात निवास करणारा मासा तथाकथित तुपात निवासाला गेला, तरी त्याचा मृत्यू निश्चित असतो, तसेच स्वधर्म सोडून परधर्मात जाणे, म्हणजे मरण ओढवून घेणे होय. हे हिंदूंना सांगण्याची वेळ आली आहे.’’