कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार !

मतदारांवर अशी वेळी येणे हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?

कोल्हापूर – जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले; मात्र शाहूवाडीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे शाहूवाडीतील मतदान केंद्रे मतदारांअभावी ओस पडली आहेत. राज्य सरकारकडून तालुका ठिकाणच्या गावांना नगरपंचायत देण्याचा निर्णय ८ वर्षांपूर्वी घेतला होता. यानंतर शाहूवाडी गावाला नगरपंचायत संमत करण्यात आली; मात्र त्याची अजूनही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी आहे. (नगरपंचायत होण्याचा निर्णय झाल्यानंतरही ८ वर्षांत जर त्याची कार्यवाही होऊ शकत नसेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय ? एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांना अशा प्रश्नांकडे शासन-प्रशासन कधी लक्ष देणार ? – संपादक)