पाकच्या महिला हस्तकाने संरक्षण मंत्रालयातील लिपिकाला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात : गोपनीय कागदपत्रे ‘आय.एस्.आय.’ला पाठवली

अटक करण्यात आलेला सरकारी लिपिक रवी चौरसिया

मुझफ्फरपूर – येथे ‘आय.एस्.आय.’ या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या एका महिला हस्तकाने संरक्षण मंत्रालयातील  एका लिपिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याच्या माध्यमातून मंत्रालयाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ‘आय.एस्.आय.’ला पाठवली. या प्रकरणी पोलिसांनी सरकारी लिपिक रवी चौरसिया याला अटक करण्यात आली.

फेसबुकवर रवी चौरसिया याची शानवी शर्मा नावाच्या तरुणीशी ओळख झाली. शानवीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर रवीने पैशांच्या लालसेपोटी तिला संरक्षणाशी संबंधित गोपनीय माहिती पुरवली. यानंतर तिने ही माहिती आय.एस्.आय.ला पाठवली. याविषयी माहिती देतांना वरिष्ठ पोलीस अधीक्षक जयंत कांत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रवी चौरसिया याने अनेक गोपनीय कागदपत्रे  ‘आय.एस्.आय.’ला पाठवली आहेत. याविषयी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे  रवी चौरसिया याला अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • असे गंभीर प्रकार वारंवार घडूनही ते रोखता न येणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! यापूर्वी अनेकदा अशा घटना घडूनही त्यांतील दोषीला कठोरात कठोर शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच देशद्रोह्यांचे फावते !
  • सरकारने अशांवर देशद्रोहाचा खटला भरून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे !