मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या ‘बिर्याणी बाय किलो’च्या उपाहारगृहमालकांना धारकर्‍यांनी शिकवला धडा !

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या ‘बिर्याणी बाय किलो’च्या उपाहारगृहमालकांना धारकर्‍यांनी शिकवला धडा

कोल्हापूर – कोल्हापूर येथील ‘बिर्याणी बाय किलो’ या उपाहारगृहात मोगलांचे वंशज बहादूरशहा जफर याचे चित्र लावण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात हिंदूंवर अत्याचार करणार्‍या औरंगजेब अथवा मोगल यांचे कोणत्याही मार्गाने उदात्तीकरण नको, असे यापूर्वीही या उपाहारगृहमालकांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी सांगितले होते; मात्र यानंतरही या उपाहारगृहमालकांनी चित्र हटवले नाही. यामुळे संतप्त झालेल्या धारकर्‍यांनी हे चित्र उपाहारगृहाच्या बाहेर आणून फाडून त्या उपाहारगृहमालकांना धडा शिकवला.

(दि.१५ डिसेंबर २०२२
श्रीशिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आणि छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे ४० दिवस अनन्वित अत्याचार करणाऱ्या मुघल साम्राज्याचा हरामखोर शासक औरंगजेबाचे किंवा त्याचा वंशावलीतील शासकाचे चित्र बिर्याणी बाय किलो (शाखा – ७ वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) या हॉटेल मध्ये लावण्यात आले होते. तोंडी सांगून सुद्धा ते चित्र त्यांनी काढले नाही. अखेर राग अनावर झाल्याने ते चित्र धारकरी बांधवांनी हॉटेलच्या बाहेर आणून फाडून निषेध व्यक्त करत धारकरी पॅटर्न दाखवला.
बिर्याणी बाय किलो या हॉटेलच्या देशभरातील ४० शाखेमध्ये असेच औरंगजेब किंवा मुघल प्रशासक यांचे चित्र लावण्यात आले आहे. या कृत्यातून कृर, कुकर्मी, औरंगजेबाबद्दल प्रेम दाखवण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे.
स्वतच्या बापाला-भावाला ठार मारणारा, आणि धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराजांचे अत्यंत अनन्वित हाल करुन मारणारा औरंगजेब देशातील देशद्रोही लोकांना आदर्श वाटत आहे. याचा राग अनावर झाल्याने व धार्मीक भावना दुखावल्या मुळे धारकरी बांधवांनी तो फोटो फाडून निषेध व्यक्त केला.
*श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर*)

‘बिर्याणी बाय किलो’च्या देशभरात ४० शाखा असून अनेक शाखांमध्ये औरंगजेबाच्या वंशावळातील, तसेच मोगलांचे उदात्तीकरण करणारी चित्रे लावण्यात आली आहेत. ज्या औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराज यांना अनन्वित अत्याचार करून ठार मारले त्याच्या वंशावळीतील मोगलांचे उदात्तीकरण या देशात कशासाठी ? या देशातील काही लोकांना अद्याप मोगल आदर्श वाटतात का ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे.