सोलापूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरव समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गुरव समाजाच्या मुलांचे शिक्षण चांगले व्हायला हवे. त्यांना रोजगार मिळायला हवा. यासाठी ‘संत काशीबा युवा विकास योजना’ चालू करण्यात येईल. या योजनेसाठी प्रारंभी ५० कोटी रुपये निधी दिला जाईल. त्यापुढेही योजनेचा विस्तार करण्यात येईल.’’ या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
राज्य सरकार गुरव समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. ओ.बी.सी. महामंडळाच्या अंतर्गत संत काशिबा युवा विकास योजना सुरू करून त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रू.५०कोटींचे भांडवल देण्यात येईल व निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. pic.twitter.com/nJ3boDzj04
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 11, 2022
पंढरपूर येथील परंपरा आणि मठ-मंदिरे यांना सुरक्षित ठेऊन ‘कॉरिडॉर’ बनवण्यात येणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंढरपूर येथील ‘कॉरिडॉर’ घोषित केल्यानंतर त्याविषयी अनेकांनी वाद निर्माण केला आहे. ‘कॉरिडॉर’ हा सर्वांना समवेत घेऊन केला जाणार आहे. कोणतेही मठ आणि मंदिर तोडून तो केला जाणार नाही. पंढरपूर येथील सर्व परंपरा आणि मठ, मंदिरे यांना सुरक्षित ठेऊन येथे येणार्या वारकर्यांसाठी अधिकाधिक सोयी कशा करता येतील हे विचारात घेऊन ‘कॉरिडॉर’ करण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही कॉरिडॉरविषयी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नये.