तक्रारीनंतर पोलिसांकडून चौकशी चालू !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथे काही मुसलमानांकडून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नागरिकांना धर्मांतर करण्याचे आवाहन केले जात आहे. यात इस्लामची संपूर्ण माहिती दिली जाऊन इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन केले जात आहे. वाराणसीमध्ये अनेक लोकांना त्यांच्या व्हॉट्स अॅपवर अशा प्रकारचे संदेश प्राप्त होत आहेत. या प्रकरणी बनारस हिंदु विश्वविद्यालयातील मृत्युंजय या उद्योजक तरुणाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. वाराणसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ‘सायबर सेल’कडे सोपवण्यात आले आहे. तपासाअंती अहवाल येताच दोषींवर तातडीने कारवाई केली जाईल.
‘दिल से कबूल करें इस्लाम, धरती पर सिर्फ अल्लाह का वजूद’ मैसेज में धर्म परिवर्तन को लेकर दिया गया लालच#Varanasi | #Islam | #UttarPradesh | #UPNews https://t.co/wqT5rroMsZ
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) December 7, 2022
मृत्युंजय यांच्या व्हॉट्स अॅपवर पाठवण्यात आलेल्या संदेशात म्हटले होते की, आमच्या ‘चॅट’मध्ये (संभाषणात) आपले स्वागत आहे. तुम्ही इस्लामविषयी मोकळेपणाने काहीही विचारू शकता. मी तुम्हाला इस्लाम धर्म स्वीकारण्यास साहाय्य करू शकतो.’ यासमवेत संदेश पाठवणार्याने इस्लामचा उदय आणि इतिहास यांविषयीही माहिती पाठवली. मृत्युंजय यांनी सांगितले की, त्यांच्या ओळखीतल इतरांनाही असे संदेश आले आहेत.
संपादकीय भूमिकाइस्लामी देशांत हिंदू कधी असा प्रयत्न करू शकतात का ? धर्मनिरपेक्ष देशात हिंदू कधी अन्यांचे धर्मांतर करण्याचे धाडस करत नाहीत; मात्र मुसलमान आणि ख्रिस्ती हे हिंदूंना त्यांच्या धर्मांत आणण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात अन् त्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर करतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! |