पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ करणारा सरपंच सत्तार याला अटक

सत्तारच्या शिवीगाळमुळे हिंदूंमध्ये भीती !

अटक करण्यात आलेला आरोपी सरपंच सत्तार

सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथील खानापूर सादात गावाचा सरपंच सत्तार याला राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्या विधानांचा एक ऑडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. अंकित नावाच्या तरुणाने तक्रार केल्यानंतर सत्तार याला अटक करण्यात आली.

अंकित याने तक्रारीत म्हटले आहे की, तो या गावात त्याच्या मित्रासह गेला असता सत्तार तेथे योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करत असल्याचे त्याला दिसले. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने ठार मारण्याची धमकी दिली, तसेच हिंदूंविषयीही तो आक्षेपार्ह बोलू लागला. याच वेळी स्थानिक हिंदू घाबरले आणि त्यांनी घरे अन् दुकाने बंद केली. सत्तार याची विधाने अंकित याने ध्वनीमुद्रित करून प्रसारित केली.

संपादकीय भूमिका

  • असे भित्रे हिंदू काय कामाचे ? हिंदु धर्माचरण करत नसल्याने त्यांच्यात धर्माभिमान आणि क्षात्रतेज निर्माण होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. यासाठी हिंदूंच्या संघटनांनी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्माभिमान निर्माण करणे आवश्यक !
  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना भीती वाटते, हे अन्यत्रच्या हिंदूंना अपेक्षित नाही !