आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदु महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान !

पुणे – अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या अमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदु महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हिंदु महासंघाचे संस्थापक श्री. आनंद दवे, अधिवक्ता सुबोध पाठक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत मनोज तारे, प्रीतम देसाई उपस्थित होते.

 (सौजन्य : TV9 Marathi)

श्री. आनंद दवे यांनी सांगितले की, घटनास्थळी रंगेहाथ पकडले गेलेल्या, गुन्हा मान्य असल्याचे अन्वेषण अधिकार्‍यांपुढे मान्य केलेल्या आणि त्याच आधारावर न्यायालयाने २ वेळा जामीन नाकारल्या गेलेल्या आर्यन खान अन् त्याच्या सहकार्‍यांना अन्वेषण यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्दोष मुक्त केले. हिंदु महासंघाने त्याविरोधात न्यायालयात आव्हान दिले असून या संपूर्ण प्रक्रियेत अन्वेषण यंत्रणा किती गाफिल राहिल्या, त्यांनी कसे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन या सर्व आरोपींना साहाय्य केले, ही सूत्रे उपस्थित केली. याची पूर्ण ३६ पानांची कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत.