हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात जागृती आणि बहिष्कार या शस्त्रांनी लढले पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

इंदूर येथील भारतीय उद्योग व्यापारी मंडळामध्ये ‘हलाल प्रमाणपत्र’ विषयावर मार्गदर्शन पार पडले !

भारतीय उद्योग व्यापारी मंडळामध्ये मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे

इंदूर (मध्यप्रदेश) – हलाल प्रमाणपत्र केवळ एक प्रमाणपत्र नाही, तर ते देश आणि हिंदु धर्म यांवरील अप्रत्यक्ष स्वरूपाचे आक्रमण आहे. ब्रिटिशही व्यापारासाठी आले आणि देशावर १५० वर्षे राज्य करून गेले. त्याप्रमाणेच हलाल प्रमाणपत्र हिंदूंचे व्यापार आणि रोजगार यांच्यावर परिणाम करत आहे. म्हणून या विरोधात जागृती आणि बहिष्कार या शस्त्रांनी लढले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

भारतीय उद्योग व्यापारी मंडळाच्या पदाधिकार्‍यांना ‘हलाल जिहाद’विषयीचा ग्रंथ भेट देतांना मध्यभागी श्री. रमेश शिंदे

येथील भारतीय उद्योग व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांनी भविष्यात या षड्यंत्राला थांबवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार केला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. मनीष बिसानी, प्रदेश महामंत्री श्री. निर्मल वर्मा, मिडिया प्रभारी श्री. राम मुंदडा, भाजप व्यापारी मंडळाचे संघटनमंत्री श्री. संजय आहुजा, महाराणी रोड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. जितेंद्र परमानी, माहेश्वरी समाजाचे श्री. रजत लढ्ढा, व्यावसायिक सर्वश्री रमेश खत्री, पियुष मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते. या आयोजनासाठी व्यावसायिक श्री. रामस्वरूप मुंदडा यांनी प्रयत्न केले.