तमिळनाडूमध्ये द्रमुकच्या आजी-माजी मुसलमान नगरसेकांकडून ३६० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

रामनाथपूरम् (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या किनारपट्टी पोलिसांनी कोकेन या अमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणी द्रमुक या पक्षाचे कीझाकरई नगरपालिकेतील नगरसेवक सरबराज आणि त्याचा माजी नगरसेवक असणारा भाऊ जैनुद्दीन यांना अटक केली आहे. त्यांच्या वाहनातून ३६० कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. मासेमारी करणार्‍या नौकेतून हे दोघे त्यांच्याकडील कोकेन श्रीलंकेला पाठवण्याच्या सिद्धतेत होते. सादिक अली यांच्या नौकेतून हे कोकेन पाठवण्यात येणार होते. या दोघा भावांचे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांच्या टोळीशी संबंध आहेत का ? याची चौकशी गुप्तचर यंत्रणा करत आहेत.

संपादकीय भूमिका

सौदी अरेबियात अशा गुन्ह्याच्या प्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात येते, तर भारतातही ती देण्यात यावी !