कल्याण येथे ३ चोरट्यांना अटक !

ठाणे, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवाशांकडील बॅगेतील किंमती ऐवज चोरणारे राजू गायकवाड, मेघा शेख, राजेश यांना कल्याण लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे सैनिक यांनी २८ नोव्हेंबरला अटक केली आहे. मागील काही मासांपासून कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांचे भ्रमणभाषसंच, पैशांचे पाकीट चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. (कठोर शिक्षा न होण्याला चोरांचे पोलिसांसमवेत असलेले आर्थिक लागेबांधे कारणीभूत नसतील कशावरून ? – संपादक)