तब्बल ८ सहस्र ‘मिलियनेर’ भारतियांनी वर्ष २०२२ मध्ये देश सोडला !

(मिलियनेर म्हणजे किमान ८ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेले लोक)

लंडन (युनायटेड किंगडम) – जगातील सर्वाधिक १० श्रीमंतांच्या सूचीत २ ते ३ भारतीय असून गौतम अदानी हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. असे असले, तरी श्रीमंत होताच भारतीय लोक स्थलांतर करत असल्याचेही दिसून येत आहे. वर्ष २०२२ मध्ये भारतातून विदेशात गेलेल्या ‘मिलियनेर्स’ची संख्या ही तब्बल ८ सहस्र इतकी आहे.

‘बिझनेस इनसायडर’ या वृत्त संकेतस्थळाने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार ‘हेनले अँड पार्टनर्स’ नावाच्या आस्थापनाच्या अहवालाच्या आधारे ही आकडेवारी समोर आली आहे. यानुसार गतवर्षात भारतातून मिलियनेर असलेल्या ८ सहस्र नागरिकांनी देश सोडला आहे. यात रशिया पहिल्या क्रमांकावर असून रशियातून १५ सहस्र मिलियनेर नागरिक, तर चीनमधून १० सहस्र मिलियनेर नागरिक स्वदेश सोडून परदेशात वास्तव्यास गेले आहेत.