‘लव्ह जिहाद’ हद्दपार करण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने नाशिककर एकवटले !

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ महिला

नाशिक – लव्ह जिहादला हद्दपार करण्यासाठी येथील नागरिक २८ नोव्हेंबर या दिवशी मोठ्या संख्येने एकत्र आले. शहरातील बी.डी. भालेराव मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या सकल हिंदु समाजाने हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी विराट हिंदू मूक मोर्च्याचे आयोजन केले होते. मोर्च्यात सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. युवती आपल्या मागण्यांचे फलक हातात घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. प्रत्येकाने लव्ह जिहादच्या विरोधात लढा देण्याची आणि हिंदु बंधू-भगिनींच्या सुरक्षेची सर्वांकडून शपथ घेतली.

या वेळी लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशात लागू करावा, श्रद्धा वालकर हिचा मारेकरी असणार्‍या आफताबला फाशीची शिक्षा देण्यात यावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी, छत्रपती शिवरायांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्यांचे निवेदन उपस्थितांनी जिल्हाधिकारी गंगाधरन् डी. यांना  दिले. मोर्च्यात साधू-महंत, हिंदुत्वनिष्ठ, स्थानिक लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि सामान्य नाशिककर सहस्रोंच्या संख्येने उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. मोर्च्याचे आयोजन शिस्तबद्धरितीने करण्यात आले होते.

२. मोर्च्यानंतर तेथील स्वच्छताही लगेचच करण्यात आली.

३. मोर्च्यात मोठ्या संख्येने युवती सहभागी झाल्या होत्या.

हिंदु धर्माचे पूर्ण शिक्षण मिळाल्यास हिंदु तरुण-तरुणी षड्यंत्रांना बळी पडणार नाहीत ! – अधिवक्त्या पाटील, मुंबई उच्च न्यायालय

पालकांनी मुलींना प्रथमपासूनच मोकळेपणाने लव्ह जिहादविषयी सांगावे. मुलांचाही यात कसा बळी जातो, याविषयी त्यांनाही सतर्क करावे. जर हिंदु धर्माचे पूर्ण शिक्षण मिळाले, तर अशा षड्यंत्रांना हिंदु तरुण-तरुणी बळी पडणार नाहीत. लव्ह जिहादविरोधात जनजागृती करावी.

हिंदूंनो, धर्मांधांच्या मागे न लागता भगव्याची सवय करा ! – निशाताई वाघ, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्या

हिंदु महिला धर्मांधांसमवेत मैत्री का करतात ? जन्मत: तुम्ही हिंदु धर्मानुसार ज्या स्वच्छंद वातावरणात रहात आला आहात, तसे वातावरण धर्मांध तुम्हाला देतील का ? भगव्यावर विश्वास ठेवा. भगव्याची सवय करा. आवश्यकता भासल्यास पोलिसांच्या अगोदर भगवे वीरच तत्परतेने तुम्हाला संकटातून बाहेर काढतील. आम्ही नाशिकमधून लव्ह जिहाद हद्दपार करू !