झारखंड येथे हिंदु तरुणाशी विवाह करण्यासाठी मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारला !

तरुणीच्या कुटुबियांनी केला विरोध !

मुस्कानने राम कुमारशी लग्न केले.

रांची (झारखंड) – येथील मुसलमान तरुणी मुस्कान खातून हिने हिंदु धर्माचा स्वीकार करून राम नावाच्या हिंदु तरुणाशी विवाह केला.राम आणि मुस्कान दोघेही झारखंडच्या गोड्डा येथे रहातात. वर्षभरापूर्वी राम आणि मुस्कान यांच्यात मैत्री झाली आणि तिचे रूपांतर प्रेमात झाले; मात्र मुस्कानचे कुटुंबीय या नात्याविषयी खूश नव्हते; पण मुस्कानला रामशी विवाह करायचा होता. त्यामुळे त्यांनी  १७ ऑक्टोबर २०२२ या दिवशी न्यायालयात जाऊन विवाह करण्याचा प्रयत्न केला असता मुस्कानचे कुटुंबीय तेथे पोचले आणि त्यांनी विरोध केला.

या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत मुस्कानला संरक्षण दिले. ‘मी स्वतःच्या इच्छेने रामसमवेत लग्न करत आहे’, असे मुस्कानने न्यायालयात सांगत तिच्या जिवाला धोका असल्याने दिने संरक्षण मागितले. यानंतर मुस्कान आणि राम यांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. यानंतर दोघे भागलपूरला पोचले. तेथील मीनाक्षी मंदिरात गावकर्‍यांच्या उपस्थितीत मुस्कानने सनातन हिंदु धर्म स्वीकारून राम याच्याशी विवाह केला.