महानगरपालिकेत आमचा महापौर झाला, तर मेरठचे नाव ‘नथुराम गोडसे नगर’ करणार ! –  हिंदु महासभेची घोषणा

देशाला ‘हिंदु राष्ट्र’ बनवणे हे प्राधान्य !

मेरठ (उत्तरप्रदेश) – अखिल भारत हिंदु महासभेने मेरठ महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले आहे. ‘मेरठमध्ये जर हिंदु महासभेचा महापौर झाला, तर मेरठचे नाव ‘नथुराम गोडसे नगर’ असे केले जाईल, अशीही घोषणा हिंदु महासभेने केली आहे. हिंदु महासभेने घोषणापत्र प्रसिद्ध केले असून त्यात देशाला ‘हिंदु राष्ट्र’ बनवणे हे प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. या वर्षाच्या शेवटी मेरठमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत.

हिंदु महासभेचे उपाध्यक्ष पंडित अशोक शर्मा यांनी, ‘शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणे यांना देण्यात आलेल्या मुसलमान नावांना पालटून हिंदु महापुरुषांची नावे ठेवण्यात येणार आहेत. पूर्वी भाजप स्वतःला हिंदु पक्ष म्हणवत असे; पण या पक्षात आता अन्य धर्मियांचाही वरचष्मा आहे. त्याचप्रमाणे शिवसेनाही मुसलमानांचे लांगूलचालनाचे राजकारण करत आहे’, असा आरोप त्यांनी केला.