सातारा, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – सातारा नगरपरिषदेने वर्ष २०२१-२२ साठी कचरा संकलनाची निविदा अनधिकृतपणे दिल्याने सातारा नगरपरिषदेच्या विरोधात जिल्हा न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला आहे. ५ डिसेंबर या दिवशी या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे. पालिका मुख्याधिकारी, आरोग्य निरीक्षक, स्वच्छता विभागप्रमुख, स्वच्छता ठेका घेणार्या पुणे येथील भगवती स्वयंरोजगार सेवा संस्था यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया ही पक्षपातीपणे, पालिकेतील अधिकार्यांना हाताशी धरून संगनमताने राबवण्यात आली आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.