चिंचवड (पुणे), सातारा आणि बेळगाव येथेही आंदोलन

चिंचवड (पुणे) आणि सातारा येथेही हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने आंदोलन करण्यात आले. चिंचवड येथील आंदोलनात रणरागिणीच्या कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थितांना संबोधित करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची या प्रकरणी भेट घेणार असल्याचेही सांगितले. या आंदोलनात २०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. 

पुणे येथील आंदोलनात सहभागी रणरागिणी
हर्षदा धुमाळ, चिंचवड जिल्हा संयोजिका, विश्‍व हिंदु परिषद दुर्गा वाहिनी
हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर

उपस्थित मान्यवर

बेळगाव येथे आंदोलन करतांना विविध महिला संघटनांच्या पदाधिकरी आणि कार्यकर्त्या

सातारा – येथील आंदोलनात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे आणि हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांनी विषय मांडला. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री श्री. रवींद्र तथावाडेकर आणि श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. प्रशांत जाधव हेही उपस्थित होते. समाजातील लोक थांबून विषय ऐकत होते आणि काही लोक उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी होत होते.

पुणे – येथील आंदोलनात पुणे ग्रामीण विभागचे बजरंग दल संयोजक श्री. कुणाल साठे, विश्‍व हिंदु परिषदेच्या पुणे ग्रामीण विभागाचे धर्मप्रसार प्रमुख श्री. राम साळुंखे, विश्‍व हिंदु परिषदेच्या पुणे ग्रामीण विभागाचे गोरक्षक श्री. नीलेश चासकर, चाफेकर स्मारक समितीचे श्री. अतुल आडे, चाफेकर स्मारक समितीच्या व्यवस्थापक सौ. अर्चना दाभोळकर, भाजपचे नगरसेवक श्री. शीतल शिंदे, सचिव श्री. गोविंद जाधवर, पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर मंगलाताई कदम, अपर्णाताई डोके आदी मान्यवर उपस्थित होते.

बेळगाव – जय तुळजाभवानी महिला मंडळ, कर्तव्य महिला मंडळ, ओम साई महिला मंडळ, विश्‍वमांगल्य सभा, भारतीय जनता पक्ष आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आंदोलनानंतर तहसीलदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले.

प्रतिक्रिया

१. हर्षदा धुमाळ, चिंचवड जिल्हा संयोजिका, विश्‍व हिंदु परिषद दुर्गा वाहिनी – ‘लव्ह जिहाद’ सहस्रो वर्षांपासून घडत आहे. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा इस्लामी शासक भारतात येतो, भारतातील माता भगिनींची अब्रू लुटतो, भर चौकात त्यांचा लिलाव मांडतो. मुलींनो, वेळीच सावध व्हा, हिंदु समाजाला लागलेली ‘लव्ह जिहाद’ची वाळवी हा समाज पोखरण्यापासून रोखण्यासाठी एक व्हा.

२. शशिकला खुशवाह – मुलींनीही अशा मुलांसमवेत जाऊ नये. अशा धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी.

३. श्री. जोशी – आपले कायदे सक्षम नाहीत, याविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी. अशा धर्मांधांना भर चौकात हातपाय तोडून तुकडे करायला हवेत, त्याविना त्यांना जरब बसणार नाही.