स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घृणास्पद अवमानाची सव्याज परतफेड करू ! – सौ. कोमल रहाटे, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा

आम्ही सर्व रणरागिणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घृणास्पद अवमानाची सव्याज परतफेड करू !

संगमेश्‍वर (जि. रत्नागिरी) – ‘भारत जोडो’ अभियानात राहुल गांधी यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अत्यंत संतापजनक टिप्पणी केली आहे. या गोष्टीचा आम्ही सर्व भाजप कार्यकर्ते आणि सावरकरभक्त तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. आम्ही राहुल गांधी यांना आव्हान देत आहोत की, भविष्यात कधीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात पाऊल ठेवायचा विचार करत असाल, तर सावधान ! आम्ही सर्व रणरागिणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घृणास्पद अवमानाची सव्याज परतफेड करू, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप संगमेश्‍वर महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. कोमल रहाटे यांनी व्यक्त केली आहे.

जातीपातींच्या गर्तेत अडकलेल्या ‘रत्न’नगरीस दिशा देणारे दिव्य स्फूर्तिस्थान –  ‘पतितपावन मंदिर !’

सौ. कोमल रहाटे पुढे म्हणाल्या,

१. स्वातंत्र्यवीर सावरकर हे अनेक क्रांतीकारकांचे प्रेरणास्थान आणि आमच्यासाठी शक्तीस्थानच आहेत.

२. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ अशी शिकवण देणारे स्वातंत्र्यवीर राष्ट्रभक्त म्हणून थोर होतेच; पण रत्नागिरीमध्ये त्यांनी जे कार्य केले आहे, ते दैवीच म्हणावे लागेल.

३. जातीपातींच्या गर्तेत अडकलेल्या ‘रत्न’नगरीस दिशा देणारे दिव्य स्फूर्तिस्थान म्हणजे  पतितपावन मंदिर आजही या सर्वांची साक्ष देत उभे आहे.

४. ‘केवळ निदर्शने आणि जोडे मारा’ आंदोलन करून आता चालणार नाही, तर आपल्या मनातले स्वातंत्र्यवीर सावरकर प्रत्येक घरात पोचवण्यासाठी प्रत्येक सावरकर भक्ताने योगदान देण्याची आवश्यकता आहे.