आवैसी आणि अखिलेश यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा मार्ग मोकळा

ज्ञानव्यापी प्रकरणावरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखाल्याचे प्रकरण

खासदार असदुद्दीन ओवैसी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा मार्ग मोकळा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानव्यापी प्रकरणावरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्याच्या प्रकरणी खासदार असदुद्दीन ओवैसी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली. त्यामुळे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

या प्रकरणी ज्येष्ठ अधिवक्ता हरिशंकर पांडेय यांनी एका याचिकेद्वारे न्यायालयाला सांगितले की,

 (सौजन्य : ANI News)

ओवैसी आणि यादव यांनी एका कार्यक्रमात ज्ञानव्यापी प्रकरणावरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा. त्यास न्यायालयाने मान्यता दिली.