|
वारणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसीच्या जलद गती दिवाणी न्यायालयाने ज्ञानवापीच्या प्रकरणी हिंदु पक्षाकडून प्रविष्ट करण्यात आलेली याचिका सुनावणीस योग्य असल्याचे सांगत ती प्रविष्ट करून घेतली आहे. या याचिकेला मुसलमानांकडून विरोध करण्यात आला होता. या याचिकेमध्ये याचिकाकर्त्या किरन सिंह यांनी ज्ञानवापीच्या परिसरामध्ये मुसलमानांना प्रवेशबंदी करावी, हा संपूर्ण परिसर हिंदूंना सोपवावा आणि येथे सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची अनुमती मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावर आता २ डिसेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे. हे जलद गती न्यायालय असल्याने या प्रकरणावर जलद सुनावणी होऊन लवकर निकाल येण्याची शक्यता आहे. याविषयी विश्व वैदिक सनातन संघाचे कार्यकारी अध्यक्ष संतोष सिंह यांनी सांगितले की, हा आमचा मोठा विजय आहे. आता सुनावणीमध्ये आमच्या मागण्या मान्य होती, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
Gyanvapi Case: Varanasi Court To Hear Plea Seeking Worship Of ‘Shivling’ Found In Mosque Complex#GyanvapiCasehttps://t.co/PenMheqyjZ
— ABP LIVE (@abplive) November 17, 2022
पुढच्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात पूजा स्थळ कायद्याच्या संदर्भातही सुनावणी होणार आहे. ही याचिका ज्ञानवापीशी संबंधित आहे. यात १२ डिसेंबरपर्यंत केंद्रशासनाला याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. त्यानंतर जानेवारीमध्ये यावर सुनावणी होणार आहे.